*आमदार लोणीकरांच्या प्रयत्नामुळे परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये 34 ग्रामपंचायतीं ना मिळणार नवीन कार्यालय इमारत
==================
*ग्रामपंचायत इमारतीसाठी 07 कोटी 05 लक्ष रुपयाचा निधी मंजूर*
====================
*ग्रामविकासात सर्वात मोठा वाटा ग्रामपंचायत चा*
 *माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर*
==================
*गावच्या विकासासाठी, उत्तम प्रशासकीय इमारत गरजेचीच*
*आमदार बबनराव लोणीकर*
====================
प्रतिनिधी
गावचा गाव गडा चालवण्यासाठी सरपंच ग्रामसेवक व नागरिकांची उत्तम सुविधा व्हावी याकरिता, ग्रामसेवक सरपंच गावकरी यांना ग्रामसभा घेण्यासाठी  चांगली इमारत असावी याकरिता आपण प्रयत्नपूर्वक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांच्या माध्यमातून परतूर मंठा नेर शेवली भागाकरिता 34 ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करून आणली असून येत्या काळात या कामांना सुरुवात होणार आहे
त्यामुळे गावाच्या विकासाची गती वाढणार आहे असे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून अनेक नोंदी दाखले सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते मात्र अनेक ग्रामपंचायतीन मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे काम करण्यास अडचणी येत होत्या अनेक इमारती गळतात त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा  होतो यासाठी आपण खालील गावात नवीन ग्रामपंचायत इमारती बांधकाम करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे
मंजूर झालेल्या ग्रामपंचायती मंठा तालुक्यातील कटाळा खुर्द 20 लक्ष, ठेंगे वडगाव 20 लक्ष, पोखरी केंधळे  20 लक्ष, माळकिनी २० लक्ष रामतीर्थ 20लक्ष, हनवत खेडा 20 लक्ष ,केहाळ वडगाव 20 लक्ष, गुळखंड 20 लक्ष टोकवाडी 20 लक्ष टाकळ खोपा 20 लक्ष, तळतोंडी 20 लक्ष, पाडळी दुधा 20लक्ष, पांगरा गडदे 20 लक्ष लावणी २० लक्ष निंबे वडगाव 20 लक्ष विरेगव्हाण 20 लक्ष, वाघोडा तांडा 20,लक्ष, सोनुनकरवाडी 20 लक्ष, दहिफळ खंदारे 20 लक्ष पांगरी बुद्रुक 20 लक्ष , शिवनगिरी 25 लक्ष, हेलस 20, परतूर तालुक्यातील अंगालगाव 20लक्ष अंगालगाव 20 ,आसनगाव , सावरगाव बुद्रुक 20 लक्ष,  माव पाटोदा 20लक्ष रु चांगतपुरी 20 लक्ष, फुलवाडी 20लक्ष, मापेगाव बुद्रुक 20 लक्ष डोलारा 20 लक्ष तर जालना तालुक्यातील नेर शिवली भागातील शंभू सावरगाव 20 लक्ष सोनदेव 20 लक्ष रुपये निधी प्राप्त झाला असून लवकरच या ग्रामपंचायत इमारत कार्यालयाची बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!