परतूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न

परतूर (दि. 12 ऑक्टोबर 2025) — आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परतूर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे आयोजन परतूर तालुका काँग्रेस अध्यक्ष मा. बालासाहेब (काका) आकात यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

या बैठकीस प्रमुख उपस्थिती पक्ष निरीक्षक समद पटेलमा. आमदार राजेश भैया राठोडजालना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तसेच काँग्रेस ज्येष्ठ नेते अन्वर बापू देशमुख आणि मंठा तालुका अध्यक्ष नीलकंठ वायाळ यांची लाभली.

बैठकीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी आगामी निवडणुका प्रभावीपणे लढविण्यासाठी आवश्यक रणनीती, संघटन बांधणी आणि जनसंपर्क मोहिमा यांवर सविस्तर चर्चा केली. काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एकजुटीने आणि तळागाळात जाऊन काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

तालुकाध्यक्ष बालासाहेब (काका) आकात यांनी आपल्या भाषणात सांगितले की, परतूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच परतूर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवला शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,  असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आणि निरीक्षक पटेल यांना ठाम विश्वास दिला.

या बैठकीस परतूर शहर काँग्रेस अध्यक्ष गणेश कुलकर्णीआर. के. खतीब सरवैजनाथ बागलएजाज भाई जमीनदारविलास राठोडराजेश खंदारेप्रकाश घुलेबाजीराव खरातसंतोष दिंडेनगरसेवक सिद्धार्थ बंडसादेक खतीबजगनराव लाटेआसेफ जमीनदारउबेद जागीदारकदम सर आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी एकदिलाने आणि निष्ठेने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
ही बैठक उत्साहवर्धक, शिस्तबद्ध आणि परतूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!