29 October 2026
जखमी इसमाला मदत करून जीव वाचविल्याबद्दल होमगार्ड विलास भवर यांचा गौरव
Breaking News
🏠 Home › National › Article

जखमी इसमाला मदत करून जीव वाचविल्याबद्दल होमगार्ड विलास भवर यांचा गौरव

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून प्रशंसापत्र देऊन कौतुक

🎧 Audio version

सोयगाव / प्रतिनिधी 

कर्तव्य बजावत असताना जखमी इसमाला तातडीने मदत करून त्याचा जीव वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सोयगाव येथील होमगार्ड विलास काशिनाथ भवर यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिल्लोड यांच्याकडून प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.

विलास भवर हे सोयगाव पोलीस ठाण्यात बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असताना एक जखमी इसम त्यांच्या निदर्शनास आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्परतेने मदत केली. तसेच जखमी इसमाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली. त्यांच्या या समयसूचकतेमुळे आणि मदतीमुळे जखमी इसमाचा जीव वाचण्यास मदत झाली.

भवर यांनी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा, मानवतावादी दृष्टिकोन आणि प्रसंगावधान प्रशंसनीय असल्याचे प्रशंसापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले असून, भविष्यातही त्यांनी अशाच प्रकारे कर्तव्य बजावावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

✍️ Atul Rajendra Padul 🗓️ 22 Oct 2026, 06:59 PM ⏱️ 1 min read 👁️ 15,462 views
📢 Share This Story
A

Atul Rajendra Padul Reporter

Reporter at Badalta Marathwada

Copied!